थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(PM Narendra Modi) पंतप्रधान मोदी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देणार आहेत. लोकसभेत 2 दिवसांपासून गोंधळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देणार आहेत.
यातच राहुल गांधी यांना संसदेत बोलू न दिले गेले नसल्याने विरोधक संतप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे संसदेत आजही मोठा गोंधळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल झालेल्या गोंधळामुळे काँग्रेसच्या आठ खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.
यातच आता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर लोकसभेत चर्चा सुरू असून पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5 वाजता चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
पंतप्रधान लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देतील
मोदी संध्याकाळी 5 वाजता लोकसभेत उत्तर देणार
संसदेत आजही मोठा गोंधळ होण्याची शक्यता