ताज्या बातम्या

PM Narendra Modi : वैष्णोदेवी कटरा ते फिरोजपूर नवी वंदे भारत; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार एक्सप्रेसला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्ट रोजी कर्नाटकमध्ये एकदिवसीय दौऱ्यावर येणार असून, बेंगळुरूत विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा शुभारंभ व भूमिपूजन करणार आहेत.

Published by : Team Lokshahi

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्ट रोजी कर्नाटकमध्ये एकदिवसीय दौऱ्यावर येणार असून, बेंगळुरूत विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा शुभारंभ व भूमिपूजन करणार आहेत. बेंगळुरूतील केएसआर रेल्वे स्थानकातून 3 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्याचा कार्यक्रम होणार आहे. यात बेंगळुरू–बेलगाव, अमृतसर–श्री माता वैष्णोदेवी कटरा आणि नागपूर (अजनी)–पुणे या मार्गांचा समावेश आहे.

याच दौऱ्यात पंतप्रधान बेंगळुरू मेट्रोच्या यलो लाईनचा शुभारंभ करतील व आर. व्ही. रोड, राघीगुडा ते इलेक्ट्रॉनिक सिटी या मार्गावर मेट्रो प्रवासही करतील. तसेच बेंगळुरू मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात येईल. हा प्रकल्प 15,610 कोटी रुपयांचा असून, 44 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गावर 31 उंच स्टेशनांचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त, बेंगळुरू शहरातील शहरी संपर्क वाढवण्यासाठी विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही करण्यात येणार आहे. दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी सार्वजनिक कार्यक्रमात नागरिकांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावर संदेश देत बेंगळुरू दौऱ्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली असून, या उपक्रमांमुळे शहराच्या वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी गती मिळेल, असे त्यांनी नमूद केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा