( PM Narendra Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून भाषण करताना तरुणांसाठी एक मोठी घोषणा केली. त्यांनी प्रधानमंत्री विकसित भारत योजना सुरू असल्याची माहिती दिली, जी 15 ऑगस्ट 2025 पासून अंमलात येत आहे. या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी घेणाऱ्या तरुणांना सरकारकडून मासिक 15,000 रुपये दिले जातील.
योजनेसाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी राखण्यात आला असून अंदाजे 3.5 कोटी तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या योजनांचा तसेच महिलांसाठी लखपती दीदी योजनेचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “गरिबी काय असते हे मला ठाऊक आहे. म्हणून सरकारने फक्त कागदोपत्रीपुरते मर्यादित राहून नव्हे, तर जनतेच्या जीवनात सक्रिय भूमिका बजवावी.”
येणाऱ्या काळात प्रधानमंत्री विकसित भारत योजना ही केवळ तरुणांना आर्थिक मदत देणारी योजना ठरणार नाही, तर त्यांच्या करिअरला दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा ठरेल. देशातील युवा शक्तीचा योग्य वापर करून रोजगार, कौशल्यविकास आणि स्वावलंबनाचा नवा अध्याय लिहिण्याचा संकल्प या योजनेतून दिसून येतो. स्वातंत्र्य दिनाच्या या ऐतिहासिक क्षणी, देशाच्या प्रगतीसाठी सरकारने केलेली ही घोषणा नक्कीच नव्या भारताच्या निर्मितीत एक भक्कम पाऊल ठरेल.