ताज्या बातम्या

“मी तुम्हाला आत्ता वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकत नाही, पण…” : व्लादिमीर पुतीन

Published by : Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस आहे. सगळ्या स्तरातून त्यांच्यावर वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नुकतेच मोदी उझबेकिस्तानहून भारतात परत आले. या दौऱ्यात त्यांनी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीच्या निमित्ताने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली. यावेळी पुतीन मोदींना म्हणाले की, “आमच्या परंपरेनुसार तुम्हाला आधी शुभेच्छा देऊ शकत नाही”, असं म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं टाळलं, मात्र त्याचवेळी भविष्यातील वाढचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यासोबतच ते म्हणाले की, ‘‘ही युद्धाची वेळ नव्हे,’’ असा सल्ला मोदींनी पुतीन यांना दिला. ‘‘आपण युद्धाबाबत दूरध्वनीवरही चर्चा केली आहे. आता शांततेच्या मार्गाने तोडगा कसा काढता येईल, यावर चर्चा करण्याची संधी प्रत्यक्ष भेटीमुळे मिळाली,’’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यावर, ‘‘युद्धाबाबतची तुमची चिंता मी समजू शकतो. युद्ध लवकरात लवकर संपवण्याची आमचीही इच्छा आहे. मात्र युक्रेनने चर्चेत रस दाखवलेला नाही,’’

तसेच ते म्हणाले की, “माझे प्रिय मित्र मोदी..उद्या तुमचा वाढदिवस आहे. पण रशियातील आमच्या प्रथेनुसार आम्ही प्रत्यक्ष वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा देत नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला आत्ता शुभेच्छा देऊ शकत नाही. पण तुमच्या वाढदिवसाबद्दल आम्हाला माहिती आहे याची तुम्ही नोंद घ्यावी असं आम्हाला वाटतं. पण आत्ता तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. आम्ही आमचं मित्रराष्ट्र भारताला शुभेच्छा देतो. भारताची समृद्धी व्हावी अशी कामना करतो” अशा पद्धतीत मोदींना व्लादिमीर पुतीन यांनी शुभेच्छा दिल्या.

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, दोषींवर कारवाई करण्यासाठी CM शिंदेंनी दिल्या सूचना

T20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती? हार्दिक पंड्याच्या निवडीबाबत मोठी अपडेट आली समोर

दिनविशेष 14 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मुंबई, ठाणे, रायगडला अवकाळी पावसानं झोडपलं! वादळी वाऱ्यामुळं घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं, ४ जणांचा मृत्यू

"राहुल गांधी तुम्ही पाकिस्तानला घाबरा पण आम्ही भाजपवाले आहोत", पालघरमध्ये अमित शहांचा इंडिया आघाडीवर घणाघात