ताज्या बातम्या

WAVES 2025 : 'भारताकडे कथांचा खजिना'; चार दिवसीय शिखर परिषदेत पंतप्रधानांचे गौरवोद्गार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी मुंबईत जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) उद्घाटन केले.

Published by : Rashmi Mane

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी मुंबईत 'जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदे'चे (वेव्हज) उद्घाटन केले. त्यांनी शिखर परिषदेत जमलेल्या हजाराहून अधिक निर्मात्यांना प्रोत्साहन दिले. वेव्हज 2025 हा चार दिवसांचा कार्यक्रम असून मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील जाणकार या निमित्ताने एकत्र आले आहेत. 'वेव्हज 2025' ची 'कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज' ही टॅगलाइन आहे. यामध्ये 90 हून अधिक देशांचा सहभाग आहे. ज्यामध्ये 10 हजाराहून अधिक प्रतिनिधी, 1 हजार निर्माते, 300 हून अधिक कंपन्या आणि 350 हून अधिक स्टार्टअप्स सहभागी आहेत.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "'वेव्हज हे एक जागतिक व्यासपीठ आहे जे तुमच्यासारख्या प्रत्येक कलाकाराचे, प्रत्येक निर्मात्याचे आहे. जिथे प्रत्येक कलाकार, प्रत्येक तरुण एका नवीन कल्पनेसह सर्जनशील जगाशी जोडला जाईल. आज 1 मे आहे. आजच्या दिवशी, 112 वर्षांपूर्वी, 3 मे 1993 रोजी, भारतात राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. त्याचे निर्माते दादासाहेब फाळके होते आणि काल त्यांचा वाढदिवस होता. गेल्या शतकात, भारतीय चित्रपटसृष्टीने भारताला जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात यश मिळवले आहे."

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "आज वेव्हजमधील या व्यासपीठावर आपण टपाल तिकिटांद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांचे स्मरण केले आहे. गेल्या काही वर्षांत, मी गेमिंग जगतातील, संगीत जगतातील, चित्रपट निर्मात्यांच्या आणि कधीकधी पडद्यावर चमकणाऱ्या चेहऱ्यांमधील लोकांना भेटलो आहे. या चर्चांमध्ये, भारताची सर्जनशीलता, नाविन्यपूर्ण क्षमता आणि जागतिक सहकार्याचे मुद्दे अनेकदा उपस्थित केले जात होते. लाल किल्ल्यावरून मी 'सबका प्रयास' बद्दल बोललो आहे. तुम्हा सर्वांचे प्रयत्न येत्या काळात वेव्हजला नवीन उंचीवर घेऊन जातील, असा माझा विश्वास आज अधिक दृढ आहे."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज