पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा चांगलाच चर्चेत राहिला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर भाष्य केले आहे. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी संघ आणि स्वयंसेवकांच्या सेवा कार्याची स्तुती केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही असाच एक अविरत चालणारा यज्ञ आहे. जो बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करत आहे. बाह्यदृष्टी म्हणजे माधव नेत्रालय सारखे उपक्रम आहे. तर आंतरिक दृष्टी म्हणजे संघ सेवा कार्याचा पर्याय बनला आहे. हे सेवा संस्कार, ही साधना प्रत्येक स्वयंसेवकाचा प्राणवायू आहे. प्रत्येक स्वयंसेवक पिढी दर पिढी याच्यातून प्रेरित होत आहे. त्यामुळे स्वंयसेवक कधीही थकत नाही, थांबत नाही. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.