(Independence Day 2025) आज भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंगा फडकवला आणि देशाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वातंत्र्य दिनाचा लूक दरवर्षीप्रमाणे यंदाही चर्चेत आहे.
विशेषत: त्यांनी घातलेला फेटा हा या सोहळ्याचे आकर्षण ठरले आहे. फेट्याचा भगवा रंग आणि डिझाइनमधून भारताची सांस्कृतिक विविधता आणि देशभक्ती दर्शवली जात आहे. शुभ्र पांढऱ्या खादी कुर्त्यावर लालसर छटा असलेले भगवे जॅकेट आणि गळ्यात तिरंगी रंगाचा गमछा परिधान केला आहे. मागील काही वर्षांत मोदींनी घातलेले फेटे हे अधिक रंगीबेरंगी आणि पारंपरिक शैलीतील राहिले आहेत.
या खास लूकने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी भारताने 79वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यंदाची थीम ‘नवा भारत’ असून, 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या ध्येयाचे प्रतीक आहे. देशभरात ध्वजारोहण, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी आजचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे.