ताज्या बातम्या

Pune PMPML Bus : पीएमपीएमएलच्या बसेसमध्ये आता गुगल पे आणि फोन पे ची सुविधा

Published by : Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

पीएमपीएमएल बसमध्ये आता गुगल पे आणि फोन पे ची सुविधा उपलब्ध होणार आहे. गुगल पे, फोन पे द्वारे तिकीट काढण्याची सुविधा लवकरच बसमध्ये सुरु होणार आहे.पीएमपीएमएलनं हा महत्वाचा निर्णय घेतला असून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून पीएमपीएलच्या सर्व बसमध्ये स्कॅनर उपलब्ध होणार असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाने सांगितले आहे.

सुरुवातील काही बसेस मध्ये हे कोड बसवण्यात येणार आहेत. नागरिकांना आत्ता सारखे रोख रक्कम देऊनही तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे, असेही पीएमपीएमएलतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सुट्ट्या पैशांचा घोळ मिटवण्यासाठी पीएमपीएल कडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा