थोडक्यात
हाकेंवर हल्ला करणारे जेरबंद!
हल्लेखोर तिघे पोलिसांनी ताब्यात
अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
अहिल्यानगर शहराजवळील खडकी परिसरात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता हाकेंवर हल्ला करणारे तिघे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्यांच्यावर अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अशी माहिती दिली आहे. हाके यांच्यावर अहिल्यानगर तालुक्यातील खडकी परिसरातील अरणगाव शिवारात हल्ला झाला होता.
अहिल्यानगर तालुक्यात खडकी परिसरा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला असल्याचा प्रकार समोर आला होता. हाके यांच्या वाहनाच्या या हल्ल्यात काचा फोडल्या असल्याचे समजते. तालुका पोलिसांनी या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी धाव घेतली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.