Big update on theft at Eknath Khadse's House : (NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी चोरी झाली होती. चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तू, चांदी-सोने आणि रोख रक्कम चोरली. याप्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, चोरीचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.
चोरी केल्यानंतर आरोपींनी उल्हासनगरमध्ये चिराग सय्यद याच्याकडे मुद्देमाल सुपूर्द केला. चिराग सय्यद याने तो कैलास खंडेलवाल नावाच्या सराफाकडे दिला. यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तथापि, मुख्य आरोपी एजाज अहमद, मोहम्मद बिलाल आणि बाबा अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये नेमकं काय पाहिलं?
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याच्या दागिन्यांमध्ये 68 ग्रॅम सोने आणि चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे, ज्यात 7 किलो 700 ग्रॅम चांदी आहे. याशिवाय 35,000 रुपये रोख रक्कम देखील चोरीला गेली होती. एकनाथ खडसे यांनी चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये कागदपत्रे, सीडी आणि पेन ड्राईव्ह यांचा समावेश असल्याचा दावा केला होता, पण पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्यांच्याकडून काहीही आढळले नाही. चोरीची एकूण किंमत अंदाजे 10 ते 12 लाख रुपये आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी सुरू ठेवली आहे.