Siddharth Sonawane accused of Santosh Deshmukh Murder 
ताज्या बातम्या

Santosh Deshmukh यांच्या अपहरणासाठी लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणेच्या आवळल्या मुसक्या

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणे याला कल्याणमधून अटक केली आहे.

Published by : Gayatri Pisekar

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु आहे. या प्रकरणातील तीन आरोपी फरार होते. या फरार आरोपीपैंकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तसेच या आरोपींना लोकेशन पाठवणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेलाही अटक करण्यात आली आहे.

अंत्यविधीला होता हजर

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी त्यांचे लोकेशन आरोपींना देणारा सिद्धार्थ सोनवणेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला कल्याणमधून एका उसाच्या गाडीवर काम करत असताना मुसक्या आवळल्या आहेत. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे हा गावातच होता. मयत देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आता पूर्णपणे उलगडा होण्यास मदत होण्याची शक्यता आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. यापूर्वीच जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांना अटक केली. सध्या प्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे.

पोलिसांनी कसा रचला ट्रॅप?

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सुरुवातीपासूनच तपास करत असताना मस्साजोग या गावावरच लक्ष केंद्रित केलं होते. अपहरण करण्यापूर्वी कोणीतरी जवळचा व्यक्ती संतोष देशमुख यांचं लोकेशन देत असावा असा संशय पोलिसांना होता. लोकेशन देणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याची बातमी सिद्धार्थ सोनवणे याला मिळाली होती. त्यामुळे तो घटनेच्या दोन दिवसानंतर गावातून फरार झाला होता. सोनवणे फरार झाल्यामुळे पोलिसांचा संशय वाढला.

फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला. त्यानंतर सिद्धार्थचा गुन्ह्यात सहभाग असल्याची खात्री स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना पटली. सिद्धार्थ सोनवणे मुंबईत लपून बसला होता. त्याने पाच सिम कार्ड देखील वापरली होती. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना सोनवणेचे मुंबईतील लोकेशन मिळताच त्या ठिकाणी सापळा रचला. एका मोकळ्या पटांगणात उसाच्या गाड्यावर तो काम करत होता. तेव्हाच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली आणि मुसक्या आवळल्या. सिद्धार्थ सोनवणेच्या अटकेनंतर या प्रकरणातील गुंथा सोडवण्यास मदत होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा