अमोल धर्माधिकारी, पुणे
गुंड शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याचा कट पोलिसांनी उधळूण लावला आहे. शरद मोहोळच्या साथीदारांकडून पिस्तुले, काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
मोहोळचे साथीदार खूनाचा बदला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट दोन सापळा लावून मालपोटे आणि कडू यांना खराडी भागात पकडले.
आरोपींनी पिस्तुल मध्य प्रदेश मधून आणल्याची माहिती मिळत असून शरद मालपोटे आणि संदेश लहू कडू अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.