ताज्या बातम्या

पार्किंग मधील दुचाक्या चोरणारा सराईत चोरटा गजाआड

रेल्वे स्टेशन लगत असलेल्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. टिटवाळा रेल्वे स्टेशन परिसरतील पार्किंग मधून दुचाकी चोरीला गेल्याबाबत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Published by : shweta walge

अमदज खान, कल्याण : पार्किंगमध्ये पार्क केलेल्या गाड्या हेरून गाड्या चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नंदुलाल भोईर असे आरोपीचे नाव असून नंदूलाल हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात या आधी देखील कल्याण महात्मा फुले पोलीस ठाणे ,कसारा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. नंदुलाल हा महिनाभरा पूर्वी बाईक चोरीच्या गुन्ह्यातून जेलमधून सुटून आला होता.

रेल्वे स्टेशन लगत असलेल्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. टिटवाळा रेल्वे स्टेशन परिसरतील पार्किंग मधून दुचाकी चोरीला गेल्याबाबत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याण रेल्वे पोलिसांनी तत्काळ या चोरट्यांचा शोध सुरू केला परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच खबऱ्या मार्फत या चोरट्याची माहिती मिळवली, पोलिसांनी तात्काळ नंदूलालचा माग काढत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. नंदुलाल हा मूळचा राहणारे शहापूर येथे राहणारा आहे.

रेल्वे स्थानकालगत असलेल्या पार्किंग मधील दुचाकी हेरायचा व या दुचाकी चोरी करायचा. पार्किंग मधून दुचाकी चोरी केल्या प्रकरणी त्याला आधी देखील कल्याण महात्मा फुले पोलीसांनी अटक केली होती. महिनाभरापूर्वी तो जेलमधून जामिनावर सुटला होता. त्यानंतर त्याने महिनाभरात पुन्हा आपला हा चोरीचा धंदा सुरू केला व पोलीसांच्या जाळ्यात अडकला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू