जगभरात यंदा 7 जूनला बकरी ईद साजरा करणार आहेत. याच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मीरारोडमध्ये एका बकरीवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मीरारोडमधील नॉर्थ गार्डन सोसायटीमध्ये वाहनांच्या तपासणीदरम्यान बकरी सापडली. त्या ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला. मात्र बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. या प्रकरणावर सोसायटीमधील सभासदांनी मात्र काहीही प्रतिक्रिया देण्यात नकार दिला आहे. येत्या शनिवारी, 7 तारखेला साजरी करण्यात येणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आधीच मीरारोड परिसरात बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. शांतता कमिटी आणि मोहल्ला कमिटीची मिटिंग ही घेऊन कोणताही वाद न होता हा सण शांततेत पार पाडण्यासाठी योग्य ती खबरदारी पोलिसांनी घेतली आहे.
मोरोक्कोने प्राण्यांच्या कुर्बानीवर घातली बंदी
एकीकडे मीरारोडमध्ये एका बकरी वरून वाद सुरु असताना दुसरीकडे मात्र 9 टक्के लोकसंख्या असलेल्या एका इस्लामिक देशाने प्राण्याची संख्या वाढावी यासाठी प्राण्यांच्या कुर्बानीवर घातली बंदी घालण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. इस्लाममध्ये कुर्बानीला खूप महत्त्व आहे. बकरी ईदच्या दिवशी प्रामुख्याने कुर्बानी दिली जाते. बकरी ईदच्या दिवशी बकरी, मेंढी किंवा इतर कोणत्याही प्राण्याची कुर्बानी दिली जाते. बळी दिलेल्या प्राण्याचे मांस कुटुंब आणि ओळखीच्या लोकांमध्ये वाटले जाते आणि गरिबांना दान केले जाते. मात्र आता ज्यांच्याकडे बकरी सापडेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश या सरकारने दिले असून या देशाने घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद आहे.