ताज्या बातम्या

Badlapur Sexual Assault: बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर

पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या तसेच सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. बदलापूरमधील एका शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हे दृष्कृत्य केलं आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात होता. आता याच प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यानी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

पोलिसांकडून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळीबार केला. गोळीबारात आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बदलापूर अत्याचाराच्या आरोपीचा मृत्यू झाला आहे. अक्षयनं बंदुक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला होता. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात ही घटना घडली आहे.

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ट्रान्झिट रिमांडमध्ये नेत असताना त्याने पोलिसांची पिस्तूल हिसकावून स्वतःवर गोळी झाडल्याचे समजते. अक्षय शिंदे याची प्रकृती गंभीर आहे. आरोपी अक्षय शिंदे याने 3 राऊंड फायर केल्याची माहिती आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी