छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातील दरोड्याप्रकरणी पोलिसांनी 22 दिवसांत तपास करून 59 तोळे सोनं जप्त केलं आहे. याप्रकरणी 16 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशात सोनं असल्याच संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, गुरुवारी सराफा व्यावसायकांसह अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून फक्त 19 तोळे सोनं जप्त करण्यात आलं आहे. शुक्रवारी आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं त्यांना 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर बाळासाहेब इंबोले, महेश गोराडे, गणेश गोराडे, आदिनाथ जाधव, देविदास शिंदे या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
संतोष लड्डा यांच्या बजाज नगरमधील घरात पडलेल्या या धक्कादायक दरोड्यात गुन्हेगारांनी घराचा कोपरान् कोपरा धुंडाळून सुमारे 5.5 किलो सोने, 32 किलो चांदी आणि 70 हजारांची रोख रक्कम चोरून नेली होती. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ माजवली होती. पोलिसांनी झपाट्याने तपास सुरू करताना अनेकांना ताब्यात घेतले. काहीजण फरार होते, तर काहींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
हेही वाचा