धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तांदुळवाडी गावात मावेजासाठी आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पवनचक्की प्रकल्पासाठी शेतजमिनीवरून गेलेल्या टॉवरच्या मोबदल्यात एकसंध मावेजा मिळावा, अशी मागणी गणेश शेरकर या शेतकऱ्याने केली होती.
या मागणीवरून सुरू झालेल्या वादात पोलिसांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्याला जमिनीवर खाली पाडून, उरावर बसून, उसाने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तांदुळवाडी गावात मावेजासाठी आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पवनचक्की प्रकल्पासाठी शेतजमिनीवरून गेलेल्या टॉवरच्या मोबदल्यात एकसंध मावेजा मिळावा, अशी मागणी गणेश शेरकर या शेतकऱ्याने केली होती. या मागणीवरून सुरू झालेल्या वादात पोलिसांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्याला जमिनीवर खाली पाडून, उरावर बसून, उसाने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.