Molestation Team Lokshahi
ताज्या बातम्या

रक्षकच ठरला भक्षक! पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा इंजिनिअर महिलेवर बलात्कार

नग्नावस्थेतील व्हीडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप.

Published by : Sudhir Kakde

पिंपरी चिंचवड | सुशांत डुंबरे : गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchdwad) अनेक धक्कादायक घटना घडत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा (Police) धाक नसल्याचं बोललं जातंय. मात्र आता दुसरीकडे रक्षक असणारे पोलिसच भक्षक ठरत असल्याचं पाहायला मिळतंय. पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस शिपायानेच इंजिनीअर महिलेवर केलेल्या बलात्कारामुळे पोलिसांची प्रतिमा डागाळल्याचं बोललं जातंय. (Pimpri Chinchdwad Crime News)

पिंपरी चिंचवडमधून समोर आलेल्या माहितीनुसार एका पोलीस शिपायाने इंजिनीअर असलेल्या महिलेवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी विक्रम फडतरे या पोलीस शिपायाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पीडितेने भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विक्रमने विवाहीत असलेल्या पीडितेशी फेसबुकवर मैत्री केली. मग पिंपरी चिंचवडच्या लॉजवर आणले अन जबरदस्तीने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

आरोपी विक्रमने एवढ्यावरच न थांबता नग्नावस्थेत काढलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन असं अनेकदा धमकावत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेने भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी पोलीस शिपाई विक्रमला बेड्या ठोकल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा