गुरुवारी 23 ऑक्टोबरला साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. दरम्यान सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने हे फरार होते. तर प्रशांत बनकरला त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवरुन बेड्या ठोकल्या.
तर आरोपी गोपाल बदने हा दोन दिवसांनंतर स्वत:हून पोलिसांना शरण आला आहे.त्याच्यावर शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांकडून या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. तसेच या प्रकरणात आतापर्यंत नवीन नवीन खुलासे करण्यात येत आहेत. तसेच पुरावे देखील हाती लागत आहे. अशाच आरोपी पीएसआय गोपाल बनकरच्या अडचणीत वाढ झाली आहे.
त्याने सरेंडर होण्यापुर्वी स्वत:चा फोन लपवून ठेवला होता जो आता पोलिसांच्या हाती लागला आहे. गोपाल बदनेच्या नातेवाईकांनीच फलटण शहर पोलीस ठाण्यात मोबाईल जमा केल्याची माहिती समोर येत आहे. गोपाल बदनेच्या मोबाईलमुळे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात तपासाला गती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.