Manoj Jarange Mumbai Morcha : जरांगे समर्थकांच्या मानखुर्दजवळ पोलिसांनी गाड्या अडवल्या Manoj Jarange Mumbai Morcha : जरांगे समर्थकांच्या मानखुर्दजवळ पोलिसांनी गाड्या अडवल्या
ताज्या बातम्या

Manoj Jarange Mumbai Morcha : जरांगे समर्थकांच्या मानखुर्दजवळ पोलिसांनी गाड्या अडवल्या

मानखुर्दजवळ पोलिसांनी जरांगे समर्थकांना अडवलं, मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुन्हा पेटलं.

Published by : Team Lokshahi

Police Stopped Vehicles Near Mankhurd Where Jarange Supporters Were Present : मराठा आरक्षणासाठी आंदोलन पुन्हा पेटले असून, कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटलांना पोलिसांनी अडवले आहे. सकाळपासूनच जरांगे समर्थक मोठ्या संख्येने मुंबईकडे मार्गक्रमण करत होते. मात्र मानखुर्द येथे ईस्टर्न फ्री एक्सप्रेसवेवर पोलिसांनी बॅरिकेडिंग करून मोर्चा रोखला.

मोर्चा थांबवण्यात आल्यानंतर कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांनी पुढे जाण्याची परवानगी मागितली, तर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मोर्चा थांबवण्याची भूमिका घेतली. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांच्या कारवाईनंतर जरांगे समर्थकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत आपल्या मागण्यांवर तात्काळ तोडगा निघावा, अशी मागणी केली. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून ठोस पावलं उचलली जातील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या हालचालींवर आणि जरांगे यांच्या निर्णयावर आता राज्याचं लक्ष लागलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा