ताज्या बातम्या

पोलिसांची दमदार कामगिरी; दोन गांजा तस्कारांना ठोकल्या बेडया

272 किलो गांजा हस्तगत केला असून यातील आणखी काही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमझद खान | डोंबिवली : ओरीसाहून गांजा तस्करी (Ganja Smuggling) करणाऱ्या दोन जणांना मानपाडा पोलिसांना (Police) अटक करण्यात यश आले आहे. त्यांच्याकडून 272 किलो गांजा हस्तगत केला असून यातील आणखी काही आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, गांजा कोणी आणि कोणाला देण्यासाठी आाणला होता या अनुषंगाने पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

काही लोक गांजा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. यानंतर तातडीने पोलीस अधिकारी अनिल भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कल्याण ग्रामीणमधील उंबार्ली परिसरात पोहचले. याठिकाणी पोलिसांना एक संशयित इनोव्हा गाडी दिसली. गाडीत बसलेल्या व्यक्तींची पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांच्याकडून उलटसुलट उत्तरे देण्यात आली. यावरुन पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. व पोलिसांनी त्या दोन जणांना ताब्यात घेतले. गाडीची तपासणी केली असता गाडीतून 272 किलो वजनाचा गांजा आणि सहा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

याबाबत डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुऱ्हाडे यांनी सांगितले की, कारवाईत मोठया प्रमाणात गांजा जप्त केला असून या प्रकरणी फैजल ठाकूर आणि आातिफ अन्सारी या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. डीसीपी सचिन गुंजाळ, वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द