ताज्या बातम्या

Sanjay Raut : टिपू सुलतानवरून राज्यात राजकीय वाद; राऊतांचा भाजपवर जोरदार निशाणा

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी टिपू सुलतान यांची तुलना थेट Chhatrapati Shivaji Maharaj यांच्याशी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Published by : Varsha Bhasmare

राज्यात सध्या टिपू सुलतान यांच्या संदर्भातील विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी टिपू सुलतान यांची तुलना थेट Chhatrapati Shivaji Maharaj यांच्याशी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्याचा विचार दिला, त्याच धर्तीवर टिपू सुलतान यांनीही कार्य केले असल्याचे विधान सपकाळ यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेत आक्रमक भूमिका घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे खासदार Sanjay Raut यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली. टिपू सुलतान विषयी भाजप सध्या ज्या भूमिका मांडत आहे, त्या आधी इतिहासात त्यांनी काय भूमिका घेतल्या होत्या, याचा रेकॉर्ड तपासावा, असा खोचक सल्ला राऊत यांनी दिला. राऊत म्हणाले, “भाजपला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाहीत. कष्टकरी, विद्यार्थी, नोकरदार यांच्या समस्यांवर त्यांनी कधी आंदोलन केले का? पण हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून समाजात ठिणगी टाकण्याचे काम मात्र सुरू आहे.” त्यांनी आरोप केला की, मुद्दाम अशा विषयांवरून वातावरण तापवले जात आहे.

मालेगाव महापालिकेत टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आला होता. स्थानिक नागरिकांच्या आक्षेपानंतर तो फोटो काढण्यात आला. हा विषय तेथेच संपवता आला असता; मात्र भाजपने राज्यभर आंदोलन छेडले, अशी टीका राऊत यांनी केली. “महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे सांगण्यासाठी भाजपची गरज नाही,” असे ते म्हणाले.

इतिहासातील नोंदी बदलता येत नाहीत, असे स्पष्ट करत राऊत म्हणाले की, “काही गोष्टी इतिहासात नोंद झालेल्या आहेत आणि त्या कोणालाही बदलता येणार नाहीत.” त्यांनी भाजपवर दुटप्पी भूमिकेचा आरोप करत सांगितले की, पूर्वी काही प्रसंगी भाजप नेत्यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. राऊत यांनी माजी राष्ट्रपती Ramnath Kovind यांच्या विधानाचाही उल्लेख केला. कर्नाटक दौऱ्यादरम्यान त्यांनी टिपू सुलतानांविषयी सकारात्मक शब्द उच्चारले होते, तेव्हा भाजपने विरोध का केला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच काही महापालिकांमध्ये भाजपची सत्ता असताना टिपू सुलतान यांच्या नावाने प्रकल्प सुरू करण्यात आले होते, असेही त्यांनी नमूद केले.

“पुढील दोन-तीन वर्षे कोणत्याही निवडणुका नाहीत. मग उगाचच वाद वाढवण्याची गरज काय?” असा प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी महाराष्ट्राची प्रतिमा खराब करू नये, असे आवाहन केले. राज्यातील सामाजिक सलोखा आणि ऐक्य अबाधित ठेवणे सर्व पक्षांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. राज्यभरातून विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिक्रिया उमटत असून, आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा