हलाल आणि झटका प्रकारच्या मटणाच्या वादाने पुन्हा एकदा डोकं वर काढल आहे. आम्ही मटणाच्या दुकानांना मल्हार झटका प्रमाणपत्र देणार आहोत. येथे केवळ झटका मांसाची विक्री होईल. हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशन असलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करण्याचं आवाहन मत्स्य उत्पादन मंत्री नितेश राणेंनी केलं. मात्र, यावरुन आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
कोणी कसे खायचे हे सांगणारे तुम्ही कोण?- जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "आपल्याकडे जेव्ह पशुबली देतो ते हलाल पद्धतीनेच देतो. महाराष्ट्रात कधी हा वाद झाला नाही. पण, आपल्याकडे नवीन नवीन वाद उकलून काढले जाते. मल्हार आता ही पद्धत कशी देणार आहेत? झटका देणार आहेत का? झटका ही पद्धत पंजाब मध्ये शीख समुदायात आहे, त्याला एक वेगळा अर्थ आहे. आज वर्षोनुवर्षे सगळ्यांची आई मटण आणते. वेगवेगळ्या अंगाचा भाग आपण आणतो. मच्छी कशी कापणार, हलाल कापणार की मल्हार कापणार. काय लावले काय या देशात?", असा प्रश्न विचारत जितेंद्र आव्हाडांनी आपली प्रतिक्रिया मांडली.
तसेच पुढे ते म्हणाले की, "मटण विकणे इतक्या शांत पद्धतीने चालू असताना आग लावण्याची गरज काय आहे. महाराष्ट्राला आपण जातीय द्वेषाच्या माध्यमातून विभाजन करत आहोत हे लक्षात येत नाही. ज्याचे रोजगार आहे तो माणूस मरणार आहे. ज्याचं घर ह्यावर होते त्या माणसाचे हाल करून आपल्याला काय मिळणार? ही सामाजिक आणि सायंटिकफिक बाजू समजून घ्या. इस्लाम मध्ये त्याला लॉफुल अर्थ आहे. कोणी कसे खायचे हे सांगायला आणि विचारायला तुम्ही कोण?" असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रत्योत्तर दिले आहे.
काहीही बोलायचं हा राणेंचा अजेंडा- रईस शेख
समाजवादी पार्टीचे रईस शेख म्हणाले की, "झटका हलाल ज्याचा त्याचा निर्णय आहे. ज्याला जे खायच ते खा. मल्हार सर्टिफिकेट पाहिजे तर ते देखील घ्या. जनावराला स्लॅश केल्याने त्याच्या रक्तात असणारे जीवजंतू बाहेर पडतात त्यामुळे आपल्याला काही आजार होत नाही हे साध नॉलेज आहे. हे सरकारी धोरण आहे का? कोणत्याच गोष्टीसाठी प्रेशर नको. त्यांचं बोलणं फक्त राजकीय लोक ऐकतात. सामान्य त्यांच ऐकत नाही. अजून याबाबत सरकारने काहीही भूमिका घेतलेली नाही. त्यांच्या विधानावर फारस लक्ष देण्याची गरज नाही" असं आवाहन रईस शेख यांनी केलं आहे.