helicopter 
ताज्या बातम्या

निवडणुकीच्या हंगामात हेलिकॉप्टर कंपन्यांची कोट्यवधींची उड्डाणं

निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होत असल्याने नेत्यांची प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात धावपळ होत आहे. त्यामुळे या हेलिकॉप्टर आणि विमानांची दिवसाकाठी किमान २५० लँडिंग होत आहेत.

Published by : Team Lokshahi

निवडणुकीच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्राच्या आकाशात ४० हेलिकॉप्टर आणि १५ विमानांची भिरभिर सुरू झाली आहे. यावेळी निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होत असल्याने नेत्यांची प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात धावपळ होत आहे. त्यामुळे या हेलिकॉप्टर आणि विमानांची दिवसाकाठी किमान २५० लँडिंग होत आहेत.

थोडक्यात

  • महाराष्ट्रात ४० हेलिकॉप्टर आणि १५ विमानांची भिरभिर

  • दिवसभरात किमान २५० लँडिंग

  • निवडणूक हंगामात ५५० कोटी रुपयांची उलाढाल

निवडणूक हंगामाच्या निमित्ताने या उद्योगात ५५० कोटी रुपयांच्या आसपास आर्थिक उलाढाल होणार आहे. निवडणुकांमध्ये अधिकाधिक प्रचार वेगाने करण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांतर्फे आपल्या स्टार प्रचारकांसाठी हेलिकॉप्टर आणि विमानांचा वापर केला जातो.

यंदा बाहेरील राज्यातून येणारे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते हे चार्टर विमानाने येत आहेत. राज्याच्या अंतर्गत व दुर्गम भागातील पुढील प्रवास हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करीत आहेत. आतापर्यंतच्या निवडणुकांत दुपारी १२ नंतर प्रचाराला सुरुवात होत होती. मात्र, यंदाची निवडणूक एकाच टप्प्यात असल्यामुळे सकाळी नऊपासूनच प्रचार सुरू होत आहे. त्यामुळे सकाळपासूनच विमाने आणि हेलिकॉप्टर सज्ज होत आहेत.

यंदाच्या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, केवळ राष्ट्रीय आणि स्थानिक प्रमुख पक्षांनीच हेलिकॉप्टरचे बुकिंग केले नाही, तर अनेक छोट्या पक्षांनीदेखील आपल्या स्टार प्रचारकांसाठी हेलिकॉप्टर व विमानाचे बुकिंग केले आहे.

कोणाकोणाकडून हेलिकॉप्टरचा वापर?

  • भाजप - भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरचा सर्वाधिक वापर करत आहेत. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, नितीन गडकरी हे नेते गरजेनुसार वापर करत आहेत.

  • शिवसेना - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे हे नियमित हेलिकॉप्टरचा वापर करत आहेत. तर मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, रामदास कदम, अभिनेता गोविंदा हे गरजेप्रमाणे वापरतात.

  • राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट - उपमुख्यमंत्री अजित पवार हे नियमित हेलिकॉप्टरचा वापर करत असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे गरजेप्रमाणे वापरतात.

  • काँग्रेस - प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अमित देशमुख हे नियमित हेलिकॉप्टर वापरत आहेत. तर मुकुल वासनिक, विजय वड्डेटीवार, इम्रान प्रतापगढी, विश्वजित कदम हे गरजेप्रमाणे वापरतात.

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट - ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हेही हेलिकॉप्टरने प्रचारासाठी फिरत आहेत. गरज असेल तर जितेंद्र आव्हाडही हेलिक्टॉप्टर वापरतात.

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत हेलिकॉप्टरने प्रचार दौरे करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा