ताज्या बातम्या

Mumbai pollution survey : प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वेक्षण

राज्यातील हवा प्रदूषण नियंत्रण आणि सुधारणा या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) ने निर्णय घेतला आहे

Published by : Varsha Bhasmare

राज्यातील हवा प्रदूषण नियंत्रण आणि सुधारणा या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) ने निर्णय घेतला आहे की, राज्यातील हवेची गुणवत्ता आणि यंत्रणेत वापरल्या जाणार्‍या तंत्रज्ञानाची योग्य पडताळणी करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल.

यंत्रणेत वापरल्या जाणार्‍या तांत्रिक उपकरणांची गुणवत्ता योग्य आहे की नाही, याची सखोल तपासणी करणे गरजेचे आहे, असे योगेश कदम यांनी बोरीवली येथे केलेल्या पाहणी दरम्यान सांगितले. या सर्वेक्षणाचा उद्देश फक्त उपकरणांची कार्यक्षमता तपासणे नाही तर हवा प्रदूषण वाढण्यामागील घटकांची ओळख करणेही आहे.

अधिकार्यांच्या मते, प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सखोल डेटा आणि वैज्ञानिक उपाययोजना गरजेच्या आहेत. MPCB च्या या पुढील पावल्यामुळे मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा