ताज्या बातम्या

Poonam Pandey : "...म्हणून, आम्ही पूनम पांडेला ही भूमिका न देण्याचा निर्णय घेतला" मंदोदरी वादानंतर रामलीला समितीचा मोठा निर्णय

दिल्लीत होणाऱ्या लवकुश रामलीलासाठी पूनम पांडेला दिलेल्या मंदोदरीच्या वादानंतर रामलीला समितीचा मोठा निर्णय

Published by : Prachi Nate

नवरात्री उत्सवानिमित्त दरवर्षी दिल्लीत होणाऱ्या लवकुश रामलीलासाठी मॉडेल आणि वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे हिला समितीने रावणाच्या पत्नीची म्हणजेच मंदोदरीची भूमिका दिल्याचं जाहीर केलं होत. पूनम पांडे दमदार भूमिका निभावण्यासाठी योग्य असल्याने समितीने त्यांचा विचार केला होता. मात्र यानंतर रामलीला सुरू होण्यापूर्वीच वाद निर्माण झाला. पूनम पांडेला दिलेल्या भूमिकेवरुन भाजप, विश्व हिंदू परिषद आणि संतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

तिने ओन्लीफॅन्सवर अकाउंट तयार करून प्रौढांसाठी कंटेंट देखील शेअर केला असून तिच्यावर अश्लीलतेचा आरोप करण्यात आला होता, आणि तिला या तात्काळ या समितीतून बाहेर काढण्याची मागणी केली होती. यानंतर लव कुश रामलीला समितीने आज मोठा निर्णय घेतला आहे. पूनम पांडेला पत्र पाठवत तिला समितीमध्ये सामील करुन घेणे कठीण असल्याचं समितीने म्हटलं आहे.

त्याचसोबत लव कुश रामलीलामध्ये पूनम पांडे मंदोदरी साकारणार नाही याची माहिती समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार यांनी आज, मंगळवारी 23 सप्टेंबर रोजी केली आहे. त्याचसोबत त्यांनी म्हटलं आहे की, लव कुश रामलीलामध्ये चित्रपट कलाकार राम, सीता, हनुमान आणि रावणाच्या भूमिका साकारतात. त्यामुळे यंदा परशुरामच्या भूमिकेत मनोज तिवारी यांना पाहायला मिळणार असून शंकर साहनी केवटची भूमिका साकारतील.

पुढे पूनम पांडेबद्दल बोलताना अर्जुन कुमार म्हणाले की, "पूनम पांडेने लवकुश रामलीलामध्ये मंदोदरीची भूमिका करावी असा समितीने निर्णय घेतला होता. तिचा भूतकाळ बदलण्यासाठी आपण देखील तिच्या मागे ठाम उभे राहिलो पाहिजे. जर पूनमने ही भूमिका केली तर पूनमच्या मार्गावर चालणाऱ्या मुली देखील ती वाट सोडून चांगल्या मार्गाला लागतील असा आमचा विश्वास आहे".

"मात्र समितीने पूनम पांडेबद्दल घेतलेल्या निर्णयावर सर्व संत आणि ऋषींनी संताप व्यक्त केला आणि पूनम पांडे ही भूमिका का करेल यावर चर्चा सुरू केली. यामुळे लोक नाराज झाले तर संतांमध्ये फूट पडेल आणि धर्मातही फूट पडेल. लवकुश रामलीला ही धर्मांमध्ये फूट पाडण्याचे ठिकाण नाही. म्हणून, आम्ही पूनम पांडेला ही भूमिका न देण्याचा निर्णय घेतला आहे." असं म्हणत समितीच्या अध्यक्षांनी यावर्षी मंदोदरीची भूमिका दुसऱ्या कलाकाराने साकारावी असा निर्णय घेतला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा