Voting Percentage In Maharashtra 
ताज्या बातम्या

निकालात घोटाळा झाला? केंद्रीय अर्थमंत्र्यांचे पती अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी मांडलं गणित

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत सायंकाळी ५ नंतर मतांची टक्केवारी वाढली कशी असा सवाल विचारत गंभीर आरोप केले आहेत. अशातचा आता केंद्रीय अर्थमंत्र्यांचे पती अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी गणित मांडलं आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. महायुतीला घवघवीत यश मिळालं. महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएम मशिनवर तसेच निवडणूक आयोगावर शंका व्यक्त केली जाऊ लागली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत सायंकाळी ५ नंतर मतांची टक्केवारी वाढली कशी असा सवाल विचारत गंभीर आरोप केले आहेत. अशातचा आता केंद्रीय अर्थमंत्र्यांचे पती अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी गणित मांडलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होताच त्याचं विश्लेषण सुरू झालं. सत्ताधारी वर्गाकडून हा मतदारांचा स्पष्ट कौल असल्याचं सांगितलं जात होतं. विरोधकांकडून मात्र ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. त्यात आता केंद्रीय अर्थमंत्री व भाजप नेत्या निर्मला सीतारमण यांचे पती व अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांचा समावेश झाला असून त्यांनी मतांच्या टक्केवारीचं गणितच आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी मांडलं आहे. त्यानुसार मतदानाच्या दिवशी व मतमोजणीच्या आधीही मतांच्या टक्केवारीत झालेल्या वाढीवर त्यांनी बोट ठेवलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी प्रभाकर परकला यांच्या ट्विटचा दाखला देत जोरदार टीका केली आहे. पाहा रोहित पवार यांचे ट्विट -

काय म्हटले प्रभाकर परकला?

  • ५० तासांत ७६ लाख मतांची नव्याने भर पडली?

  • “मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी ५८.२२ टक्के होती.

  • ही जवळपास ५ कोटी ६४ लाख ८८ हजार ०२४ मतं होतात.

  • त्या दिवशी रात्री ११.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवाऱी थेट ६५.०२ टक्क्यांवर पोहोचली.

  • हा आकडा जवळपास ६ कोटी ३० लाख ८५ हजार ७३२ इतका आहे.

  • त्यामुळे २० नोव्हेंबरला संध्याकाळी ५ ते रात्री ११.३० यादरम्यान मतांच्या एकूण संख्येत तब्बल ६५ लाख ९७ हजार ७०८ मतांची वाढ झाली.

  • एवढंच नाही, तर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्याच्या आधी एकूण मतांमध्ये ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची भर

पाहा प्रभाकर परकला यांचं ट्विट-

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Video Viral : माता न तू वैरिणी! चिमुकलीच्या गळ्यावर पाय, स्टीलच्या चमच्याचे चापटे; जन्मदात्या आईची पोटच्या लेकीला बेदम मारहाण

Ambernath Accident : धक्कादायक! अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडले; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

Wardha Crime : शिक्षणासाठी पैसे नसल्याने 17 वर्षीय तरुणीने नैराश्यातून जीवन संपवले

Panchayat Season 5 : प्रेक्षकांना बघायला मिळणार आजी-माजी सरपंचांची लढाई; पुढील वर्षात येणार पंचायत 5 सीझन