ताज्या बातम्या

Ayodhya Ram Mandir Inauguration LIVE: प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज अयोध्येत रामराज्य परतणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची पूजा करण्यात येणार आहे.

Team Lokshahi

 Ram Mandir Inauguration LIVE: भव्य राम मंदिरात विधी झाल्यानंतर गर्भगृहातून प्रभू श्रीरामाची पहिली झलक... 

 Ram Mandir Inauguration LIVE:  प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न

Ram Mandir Inauguration LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी चांदीचं छत्र घेऊन राम मंदिराच्या गर्भगृहात दाखल

Ram Mandir Inauguration LIVE: श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात

Ram Mandir Inauguration LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात दाखल

Ram Mandir Inauguration LIVE: अयोध्येत नामवंत गायकांच्या गायनानं भक्तीमय वातावरण!

सोनू निगम, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन अशा अनेक मान्यवर गायकांचा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात समावेश आहे.

Ram Mandir Inauguration LIVE:  विरारमध्ये प्रभू श्रीरामाची भव्य रांगोळी

पालघर जिल्ह्यातील विरार पूर्वेच्या मनवेलपाडा-कारगिल नगर रोडवर बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत, आजीव पाटील यांच्या पुढाकारातून भव्य अशी श्रीरामाची रांगोळी काढण्यात आली आहे. 20 ते 22 रांगोळी कलाकारांच्या परिश्रमातून 3 हजार 846 फुटाची श्रीरामाची रांगोळी साकारण्यात आली आहे.

Ram Mandir Inauguration LIVE: अभिनेता अनुपम खेर प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्यासाठी राम मंदिर परिसरात दाखल

Ram Mandir Inauguration LIVE: सरसंघचालक मोहन भागवत अयोध्येत दाखल

आरएसएस प्रमुख मोहन भागवत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत पोहोचले आहेत.

Ram Mandir Inauguration LIVE: अयोध्येत श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लाची पूजा करण्यात येणार आहे. गर्भगृहात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

Ram Mandir Inauguration LIVE: साऊथ सुपरस्टार चिरंजीवी आणि राम चरण देखील अयोध्येत दाखल

राम चरण आणि चिरंजीवी हे दोघं सकाळी आठच्या सुमारास हैदराबादहून निघाले होते. 

Ram Mandir Inauguration LIVE: मुकेश अंबानीही संपूर्ण कुटुंबासह अयोध्येत या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार 

श्री प्रभू रामलल्लाच्या अभिषेकनिमित्त अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक VIP अयोध्येत पोहोचलं आहेत. 

Ram Mandir Inauguration LIVE: अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिग्गजांची मांदियाळी

सायना नेहवाल, सचिन तेंडुलकर, राजकुमार राव, राम चरण हे सुद्धा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत.

Ram Mandir Inauguration LIVE: रणबीर कपूर, आलिया भट्ट, रोहित शेट्टी असे अनेक सेलेब्रिटी अयोध्येला रवाना

Ram Mandir Inauguration LIVE:  प्रभू श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी लालकृष्ण अडवाणी उपस्थित राहणार नाहीत

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. 

Ram Mandir Inauguration LIVE: युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिरात दाखल

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतील राम मंदिरात पोहोचलं आहेत.

Ram Mandir Inauguration LIVE: प्रभू श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अभिनेत्री हेमा मालिनी रवाना

अभिनेत्री हेमा मालिनी त्यांच्या अयोध्येतील हॉटेलमधून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रवाना झाल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू