ताज्या बातम्या

HSC Exam Result 2025 : वडीलांचे छत्र हरपले; आईचा अचानक अपघात, तरीही बारावीत मिळवले 75 टक्के गुण

HSC Exam Result 2025: आईच्या अपघातानंतरही प्राची लाखेने बारावीत मिळवले 75 टक्के गुण, प्रेरणादायी संघर्ष.

Published by : Team Lokshahi

लहानपणी वडिलांचा आधार हरपलेली आणि आईच्या कष्टाना फळ देणारी प्राची मनोहर लाखे ही यशाच्या शिखरावर पोहचली आहे. आई धुणीभांडी करुन घर चालवत आहे. मात्र आईच्या अचानक झालेल्या अपघातामुळे सर्व जबाबदारी मुलीच्या खांद्यावर येऊन पडली. या परिस्थिती कठीण होती, पण तिने हार मानली नाही. कोल्हापूरच्या यादवनगरमध्ये राहणारी प्राची सकाळी कॉलेजला जात असे आणि त्यानंतर दिवसभर उद्यमनगरमधील पेट्रोलपंपावर काम करत असे. सकाळी ११ ते संध्याकाळी ६ पर्यंत ती पंपावर काम करून घरखर्चाला हातभार लावत होती. त्याचवेळी शिक्षणातही तिने कसलीही तडजोड केली नाही.

राजाराम कॉलेजच्या कला शाखेत शिकत असलेल्या प्राचीने बारावी परीक्षेत ७५ टक्के गुण मिळवले आणि कॉलेजमध्ये विभागात प्रथम क्रमांक पटकावला. निकालाच्या दिवशीही ती आपल्या कामावर होती. तिच्या संघर्षाची आणि मेहनतीची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. कष्ट आणि जिद्द असेल तर यशाला सुद्धा झूकावं लागत. परिस्थिती कठीण होती, पण प्राचीने हार मानली नाही. सकाळी कॉलेज, दिवसभर पेट्रोलपंपावर काम, आणि संध्याकाळी घराची जबाबदारीऱ्या तिने हसत पार पाडल्या. आईच्या अपघातानंतरही तिने शिक्षणाकडे पाठ फिरवली नाही, आणि बारावीत ७५ टक्के गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. तिचा संघर्षच तिचं यश बनला, आणि आज ती अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा