अँटालिया प्रकरणात प्रदीप शर्मांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाने प्रदीप शर्मांना जामीन नाकारल्यावर शर्मांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसूख हिरेन खून प्रकरणात हा जामीन मंजूर झाला आहे.
गेल्या आठवड्यात सुप्रीम कोर्टाने या संदर्भातला निकाल राखून ठेवला होता. . 25 फेब्रुवारी 2021 या दिवशी उद्योगपती मुकेश अंबानींचं निवासस्थान असलेल्या अँटालिया या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती.