ताज्या बातम्या

छगन भुजबळ यांच्या संदर्भातील 'त्या' दाव्यांवर प्रफुल्ल पटेल म्हणाले...

'2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकातून खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

'2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया' या पुस्तकातून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. ‘ईडीपासून मुक्ती मिळवण्यासाठी भाजपबरोबर गेलो. ईडीपासून सुटका म्हणजे माझ्यासाठी पुनर्जन्मच झाला" असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटल्याचा या पुस्तकातून दावा करण्यात आला आहे.

यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, जे काही आमची भारतीय जनता पार्टीची युती आहे वारंवार आम्ही हे सांगत आलेलो आहे की, आम्ही फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशामध्ये मोदी साहेबांचे नेतृत्वहे सगळ्यांना आवडणारे आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, देशाला सामोरे घेऊन जाणारे आहे. देशाची 10 वर्षामध्ये खूप आर्थिक आणि सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती झाली आहे आणि त्यामुळे त्यांचा विकासनामाच्या आधारावर आम्ही आज त्यांच्याबरोबर महायुतीमध्ये आहोत. असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा