Raj Thackeray & Prajakta Mali Team Lokshahi
ताज्या बातम्या

प्राजक्ता माळीने मानले राज ठाकरेंचे आभार; म्हणाली...

प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपट सृष्टीताल एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Published by : Vikrant Shinde

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यापासून सातत्याने मांडलेल्या हिंदुत्वाच्या भुमिकेमूळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आक्रमक हिंदुत्वाची भुमिकेकडे वळली असल्याचं लक्षात येत आहे. तर, मनसेच्या या भुमिकेवर विविध क्षेत्रांतील विविध लोकांकडून संमिश्र भुमिका समोर येत आहेत. महाविकास आघाडीतील (MVA Goverment) नेत्यांकडून राज ठाकरेंच्या भुमिकेवर टीका केली जात आहे तर, भाजपच्या नेत्यांकडून (BJP Leaders) राज ठाकरेंच्या भुमिकेचं स्वागत केलं जात आहे. आता मात्र अभिनेत्री प्राजक्ता माळीची (Actress Prajakta Mali) प्रतिक्रिया समोर आली आहे.

प्राजक्ता माळी ही मराठी चित्रपट सृष्टीताल एक सुप्रसिद्ध व संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. समाजातील अनेक मुद्द्यावर ती आपली प्रतिक्रीया मांडत असते. नुकतेच फेसबूकवर पोस्ट करत तिने अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देत राज ठाकरे यांनी मांडलेल्या हिंदुत्ववादी भुमिकेचं स्वागत करत आभारही मानले आहेत.

काय म्हणाली प्राजक्ता माळी:

सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना.

सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसेच मुस्लिम बांधवांना ईद च्या मनापासून शुभेच्छा .

(आज सोनं खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो टाकतेय. )

.

असो…

आज ३ तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते. #शांतताप्रिय #त्रस्तनागरिक

.

धन्यवाद मा. श्री. राज ठाकरे सगळ्याचसाठी…

परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूच्या- महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून; ऊर अभिमानानं भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली.

हल्ली मतपेट्यांचा विचार न करता, समाजाला शहाणं करण्यासाठी कोण भाषण करतं, कोण झटत..?

खूप धन्यवाद.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?