ताज्या बातम्या

जिन्नांच्या मजारीवर फुलं चढवल्याने पक्षातून काढले, आता भारतरत्न दिल्याने अडवाणी दोषमुक्त झाले का? प्रकाश आंबेडकरांचा खोचक सवाल

लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्कार म्हणजे एक प्रकारे फार्स आहे असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.

Published by : shweta walge

लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्कार म्हणजे एक प्रकारे फार्स आहे असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनी मोहम्मद जिन्ना यांच्या मजारीवर फुलं चढवले तर त्यांना पक्षातून काढले, आता त्यांना भारतरत्न जाहीर केला म्हणजे ते दोष मुक्त झाले आहेत का? असा सवाल उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केलीये.

काही ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक मराठा ओबीसी असा तेढ निर्माण करायचा असल्याचा खळबळ जनक खुलासा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ओबीसीच्या ज्या ज्या मेळाव्याला आपल्याला बोलवलं त्या मेळाव्याला गेलो असल्याचे सांगत ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल या संदर्भाची भूमिका मी मांडली आहे. मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे शेवटी मागणी मान्य करण्याचा अधिकार सरकारचा आहे आरक्षणाबाबत असं देखील आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ हा निर्माण झालेला आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.आता दोन्ही समाजाने आरक्षणवाद्यांनाच मतदान करण्याची भूमिका घेतली असल्याचं त्यांनी म्हटले आहे. पूर्वीपासून निजामी आणि श्रीमंत मराठ्यांकडेच सत्ता राहिली आहे, त्यांनी आपली संपत्ती ही गोरगरीब मराठ्यांच्या जोरावरती वाढवली आहे.स्वतःच्या फायद्यासाठी आणि राजकारणासाठी समाजामध्ये तेढ वाढवणे माझ्या दृष्टीने गुन्हा आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान गणपत गायकवाड प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, उल्हासनगरमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार केला यावरून केवळ गृहमंत्रीच नाही तर हे संपूर्ण सरकारच अपयशी ठरलं असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. या सरकारमध्ये आमदार राजे झाले आहेत कारण त्यांना माहिती आहे की हे सरकार आमदारांच्या भरोशावर चालत आहे त्यामुळे त्यांना जसं पाहिजे तसं ते शासनाला झुकवतात याबाबत एका कार्यक्रमात सोबत असल्यामुळे सकाळीच फडणवीस यांना मी बोललो त्यांनी कारवाईचे आदेश दिल्याचे म्हटलं पण नेमके कोणते आदेश दिलेत हे मात्र मी विचारू शकलो नाही असं देखील आंबेडकर म्हणाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा

Mumbai Mega Block : मुंबईकरांनो! आज लोकलचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक