जालना शहरात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर त्याचे पडसाद शनिवारी राज्यभरात उमटत आहेत. त्यावरच 'आदेश दिल्याशिवाय पोलीस कधीही लाठीचार्ज करत नाही' असं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी गृहविभागाकडे बोट दाखवत म्हणाले आहेत. लोकशाही मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
ते म्हणाले की, राज्य मराठ्याचे पेशवे चालवताहेत. आरएसएस आणि एनसीपी यातून पेशवाई अवतरली आहे. रयतेतील मराठ्याला निजामी मराठ्याला दाबले आहे. मराठा आणि ओबीसीच्या संघर्षात वंचितने मध्यस्थी केली होती. ओबीसी विरुद्ध मराठा हा प्रकार सुरू असल्यांचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, सेनेची फूट ही प्रमाणिक वाटते, राष्ट्रवादीची फूट प्रामाणिक वाटत नाही असं देखील ते म्हणाले आहेत.