गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्यामध्ये धुमस पेटलेली पाहायला मिळत आहे. प्रकाश महाजन यांनी मंत्री नितेश राणेंची उंची काढली. त्यानंतर मात्र नारायण राणे यांनी प्रकाश महाजनांची औकात काढली. दरम्यान प्रकाश महाजन यांनी छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात थेट आंदोलन करत नारायण राणेंविरोधात दंडही थोपाटले. आता नारायण राणे यांनी पुन्हा एकदा प्रकाश महाजनांना डिवचलं आहे. "प्रकाश महाजन मेंटल आहे हा माणूस' … 'त्याच्याशी माझी तुलना करता का' ..'त्याची आणि माझी बरोबरी करू नका .. "असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. यानंतर दोघांमधला वाद नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे.