Prakash Mahajan  Team Lokshahi
ताज्या बातम्या

Prakash Mahajan : उद्धव ठाकरेंचा सल्लागार कोण?

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेचा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी खरपूस समाचार घेतलाय.

Published by : shweta walge

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी आपल्या राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे असं वक्तव्य केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत मी फडतूस नाही तर काडतूस आहे असं म्हणाले. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेचा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी खरपूस समाचार घेतलाय.

काय म्हणाले प्रकाश महाजन?

स्वतःचं हिंदुत्व श्रेष्ठ ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे हे महिलांची ढाल पुढे करत आहेत. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी सोबत काम केलं आहे. सरकार चालवलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सुसंस्कृत आणि संयमी माणसाचं मूल्यमापन करून त्यांना फडतूस म्हणणं योग्य नाही. उद्धव ठाकरेंचा सल्लागार कोण आहे याचा मला प्रश्न पडतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून स्वतःचं हिंदुत्व श्रेष्ठ ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे महिलांची ढाल पुढे करत आहेत. हा किती विचित्र प्रकार आहे.

पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या मागच्या तीन सभा मी ऐकल्या. अनिल देशमुखांच्या सहा वर्षांच्या नातीच्या चौकशीचा मुद्दा त्यांनी मांडला. ईडीने लालू प्रसाद यादव यांच्या गर्भवती सुनेची चौकशी केली हे उदाहरण त्यांनी दिलं. त्यानंतर आता रोशनी शिंदेंचा विषय त्यांनी राजकारणाचा केला. तर दुसरीकडे तुमचाच सहकारी संजय राऊत एका महिलेला शिव्या देतो त्याबाबत एक शब्दही उद्धव ठाकरे उच्चारत नाहीत. तुमच्याच काळात केतकी चितळेला तुरुंगवास सहन करावा लागला. कंगनाला त्रास दिला गेला. राजकारणात तुम्ही स्त्रियांना का पुढे करत आहात? राजकारणाच्या सोयीसाठी स्त्रियांची ढाल करणं हा कुठला समजंसपणा आहे? असाही प्रश्न प्रकाश महाजन यांनी विचारला आहे.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. आता मंत्रिमंडळ विस्तारात गुंडमंत्री असे पद निर्माण करून त्या मंत्र्याला गुंड पोसण्याचे काम द्यावे.”

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा