काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांनी पुन्हा लाडकी बहीण योजनेवरुन सरकारला धारेवर धरलं आहे. सरकारची तिजोरी रिकामी झालीय. आता 9 लाख लाडकी बहीण योजनेतून काढले जाणार आहेत. सरकारकडे इतर योजनेसाठी पैसे नाहीत कारण सगळे पैसे लाडकी बहीणवर वापरले. त्यांना EVM करायचे होते पण आम्ही लाडकी बहीणमुळे आम्ही जिंकलो हे दाखवायचे होते म्हणून त्यांनी लाडकी बहीण आणली अशी टीका त्यांनी यावेळेस केली आहे.