मराठी सिनेविश्वात सध्या लग्नसोहळ्यांची चांगलीच धामधूम सुरू आहे. अनेक कलाकारांच्या घरी आनंदाचे क्षण अनुभवायला मिळत असून आता अभिनेता प्रसाद ओक यांच्या घरातूनही खुशखबर आली आहे.
प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांचा मोठा मुलगा सार्थक ओक याचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. 19 जानेवारी 2026 रोजी झालेल्या या खास कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने हे क्षण चाहत्यांसोबत शेअर करत ही आनंदाची बातमी दिली.
सार्थकच्या होणाऱ्या पत्नीचे नाव रितू असून, “कुटुंबात स्वागत आहे रितू” अशा शब्दांत अमृताने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या सोहळ्याला ओक कुटुंबीयांसह अनेक मराठी कलाकारांची उपस्थिती होती. साखरपुड्यात सार्थक साध्या पण देखण्या पोशाखात दिसला, तर रितू पारंपरिक वेशात खुलून दिसत होती. एकूणच, ओक कुटुंबातील हा आनंदाचा क्षण चाहत्यांसाठीही खास ठरला आहे.
थोडक्यात
मराठी मनोरंजनसृष्टीत लगीनसराई सुरू
गेल्या काही दिवसांत अनेक लोकप्रिय मराठी कलाकार लग्नबंधणात अडकले
मागील वर्षी अनेक कलाकारांच्या मुलांनी नवीन आयुष्याची सुरूवात केली
अलीकडेच आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लग्नबंधणात अडकला
आता प्रसाद ओकच्या घरीही आनंदाची बातमी
अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक प्रसाद ओकच्या घरी लवकरच सनई चौघडे वाजणार