प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. प्रशांत कोरटकर सध्या पोलीस कोठडीत आहे.
याचवेळी इंद्रजीत सावंत यांना मीच फोन केला होता अशी कबुली प्रशांत कोरटकरने दिल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच मोबाईलमधील डाटादेखील डिलीट केल्याचं कोरटकरकडून कबुली देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी मध्यरात्री 5 तास कोरटकरची चौकशी केल्याची माहिती आहे.
यातच मध्यरात्री प्रशांत कोरटकरला छातीत दुखण्याचा त्रास झाला असून मध्यरात्रीच कोरटकरची वैद्यकीय तपासणी झाली आणि त्याला तपासासाठी दुसरीकडे हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.