इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी कळंबा कारागृहात असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सत्र यालयात आज सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान त्याला जामीन मिळणार की न्यायालयीन कोठडीत वाढ होणार याचा निर्णय सुनावणीअंती समोर येईल. इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे युक्तिवाद करत आहेत.
प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळेस त्याला तीन दिवसीय कोठडी सुनवण्यात आली होती. दरम्यान, २८ मार्च रोजी झालेल्या सुनावणीसाठी आलेल्या प्रशांत कोरटकरवर कोर्टाच्या आवारात वकिलाने हल्ला केला होता. कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात प्रशांत कोरटकरला आणण्यात आले होते. कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला आणखीन दोन दिवसीय म्हणजेच 30 मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती.