प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळेस त्याला तीन दिवसीय कोठडी सुनवण्यात आली होती. आज प्रशांत कोरटकरवर कोर्टाच्या आवारात वकिलाने हल्ला केला आहे.
कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात आज प्रशांत कोरटकरला आणण्यात आलं होते. कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आज त्याला आणखीन दोन दिवसीय म्हणजेच 30 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. यावेळेस प्रशांत कोरटकरला कोर्टरुम मधून बाहेर घेऊन जात असताना त्याच्यावर अमित भोसले या वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकारामुळे कोर्टाच्या आवारामध्येच मोठा तणाव निर्माण झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रशांत कोरटकरवर यापूर्वीचप्पल फेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. चिल्लर फेकण्याचा प्रयत्न केलेला होता. आता कोर्टाच्या आवारात एवढा चोक पोलीस बंदोबस्त असताना एका वकिलाने अशा प्रकारचा हल्ला केल्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. अमित भोसले याने कोर्टामध्ये कोरटकरवर शिवीगाळीचा प्रयत्न केला होता. सध्या वकिलाला पोलिस कोर्टाच्या आवारापासून दूर घेऊन गेले आहे.