Pravin Darekar Team Lokshahi
ताज्या बातम्या

राज ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर प्रवीण दरेकरांची पहिली प्रतिक्रिया

राज्य सरकारकडून अघोषित आणीबाणी लागू झाली असल्याचंही ते म्हणाले.

Published by : Vikrant Shinde

मनसे अध्यक्ष राज (MNS Chief Raj Thackeray) ठाकरे यांनी औरंगाबाद (MNS Aurangabad Rally) येथे घेतलेल्या जाहीर सभेनंतर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अशी शक्यता वर्तविली जात होती. आता मात्र औरंगाबाद येथील सिटी चौक पोलिसात राज ठाकरेंविरोधीत गुन्हा दाखल झाला आहे. त्या नंतर सर्व राजकीय पक्षातील नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रीया समोर येत आहेत. आता भाजप नेते व विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (BJP Leader Praveen Darekar) यांची प्रतिक्रीया समोर आली आहे.

प्रवीण दरेकरांनी ह्या विषयावर बोलताना "राज्य सरकारच्या मनात सुडाची भावना आहे. तर, राज यांच्या हिंदुत्त्वाच्या भुमिकेला प्रतिसाद मिळत असल्याने राज्य सरकारने ही कारवाई केली" असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यासोबतच राज्य सरकारकडून अघोषित आणीबाणी लागू झाली असल्याचंही ते म्हणाले. राज्यसरकारवर टीका करत असतानाच त्यांनी "राज हे स्वयंभू नेतृत्त्व आहे" अश्या शब्दांत राज यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

पोलिसांची भुमिका काय?

राज ठाकरे यांना औरंगाबाद येथील सभेला परवानगी देण्यापुर्वी 16 अटी घालण्यात आल्या होत्या. तर औरंगाबाद येथील सभेमध्ये त्या 16 अटींपैकी 12 अटींचं उल्लंघन करण्यात आलं असल्याचं मत पोलिसांनी मांडलं आहे. याप्रकरणी राज ठाकरेंवर 116,117 व 153 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?