ताज्या बातम्या

Pregnancy Tips : गरोदरपणामध्ये दूध पिण्याचे फायदे कोणते आहेत? जाणून घ्या

गरोदरपणात दूध पिण्याचे फायदे: कॅल्शियम आणि प्रथिनांचा उत्तम स्त्रोत, आई-बाळाच्या आरोग्यासाठी दूध आवश्यक.

Published by : Team Lokshahi

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

गर्भसंस्कार म्हणजे गरोदरपणात आई आणि बाळाचं आरोग्य उत्तम रहावे. बाळाला समाजाची भरभराट व्हावी. या उद्देशाने सांगितेल शास्त्रामध्ये गरोदरपणात ही गर्भसंस्कार करण्याची सर्वात्तम पायरी आहे. आई जे काही खाईल त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होणार असतो.यामुळे गर्भसंस्कारात आहाराबद्दल सखोल माहिती आणि मार्गदर्शन दिले जाते. बाळाच्या जन्मानंतर त्याच पहिलं अन्न दूध असतं, त्याच्यासाठी दूध हे पुर्ण अन्न असते. त्यामुळे गरोदरपणामध्ये दररोज किमान दोनवेळा गायीचे दूधपिणे आवश्यक असते. जर गाईचे दूध उपलब्ध नसेल तर, त्याऐवजी म्हशीचं दूध पिलेले चालते. दूध बाजारातून विकत आणले की, त्याला उकळी फुटेपर्यंत गरम करावे, तसेच कोमट किंवा साधारण तापमानचं झाल्यावर त्यात चांगली गुणवत्ता तयार होते.

दुधाच्या बाबतीत नेहमी लक्षात ठेवा ते म्हणजे सूर्यास्तानंतर दूध पिऊ नये. सूर्य आकाशात असेपर्यंत प्यायलेलं दूध पचायला सोपं असतं. रात्री अपरात्री दूध प्यायलेल्याने थंड दुधानी तात्पुरतं बरं वाटत असलं, तरी ते एकंदर आरोग्यासाठी चांगलं नसतं. आजकाल बऱ्याच तरुणाईला दूध प्यायला अजिबात आवडत नाही पण कॅल्शियम calcium , प्रथिने protein चा उत्तम स्त्रोत असलेलं दूध गरोदरपणामध्ये नियमित घेणं आवश्यक आहे. यामुळे एक तर नवजात बाळाला आईचं दूध पुरेसं मिळतं. आईला स्वतःला कंबरदुखी, पाठदुखी, अशक्तता असे त्रास सहसा होत नाहीत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा