Suicide  Team Lokshahi
ताज्या बातम्या

दोन महिन्यांच्या गर्भवतीची आत्महत्या; वर्षभरपूर्वीच झालं होतं लग्न

Aurangabad : या घटनेनंतर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली.

Published by : Sudhir Kakde

औरंगाबाद | सचिन बडे :  वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या दोन महिन्यांच्या गर्भवती असलेल्या २४ वर्षीय नाव विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना वाळूज औद्योगिक नगरीतील बजाजनगर भागात आज पहाटे समोर आली.घटनेनंतर घाटी रुग्णालयात नातेवाईकामध्ये एवढी तुंबळ हाणामारी झाली की, परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जयश्री रितेश पाटील वय-24 (रा.बाजाजनगर, औरंगाबाद) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जयश्रीने राहत्याघारी सिलिंगफॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले.पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत जायश्रीला फसवरून खाली उतरवत रुग्णालयात हलविले मात्र तो पर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.घाटीतील वैधकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.जयश्री मृत झाल्याची माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन गृह गाठले.यावेळी नातेवाईकमध्ये तुफान हाणामारी सुरू झाली.

वाद वाढू नये आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.जयश्रीच्या मृत्यू प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raigad : रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Navi Mumbai : नवी मुंबईतील तुर्भेच्या गोडाऊनला भीषण आग

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Harbour Line : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद