थोडक्यात
नागपुरात बच्चू कडूंच्या जंगी स्वागताची तयारी
विमानतळ ते आंदोलन स्थळापर्यंत जंगी स्वागत
शेतकरी कडूंच्या स्वागतासाठी नागपूर विमानतळावर जाणार
(Bacchu Kadu) कर्जमाफी, सातबारा कोरा आणि शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारलेलं. याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक बोलावून बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करत येत्या 30 जून 2026 पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिलं आहे.
यातच आता नागपूरात बच्चू कडू यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे. नागपूरात आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांकडून बच्चू कडू यांचं नागपूर विमानतळ ते आंदोलन स्थळापर्यंत जंगी स्वागत करण्यात येणार असून सर्व शेतकरी नागपूर विमानतळावर बच्चू कडूंच्या स्वागतासाठी जाणार आहेत. 
बच्चू कडू दुपारपर्यंत आंदोलनस्थळी जाऊन मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील चर्चेबाबत माहिती देत आंदोलनाची सांगता करण्याची शक्यता वर्तण्यात येत असून आता बच्चू कडू आंदोलनाबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.