ताज्या बातम्या

President Oath Ceremony : द्रौपदी मुर्मू आज घेणार राष्ट्रपती पदाची शपथ,असा पार पडेल सोहळा

भारताच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांचा शपथविधी आज (सोमवारी, ता. २५) संसदेच्या मध्यवर्ती कक्षात (सेंट्रल हॉल) होणार आहे. सरन्यायाधीशांनी शपथ दिल्यानंतर नव्या राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

President Oath Ceremony : भारताच्या नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांचा शपथविधी आज (सोमवारी, ता. २५) संसदेच्या मध्यवर्ती कक्षात (सेंट्रल हॉल) होणार आहे. सरन्यायाधीशांनी शपथ दिल्यानंतर नव्या राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे. यानंतर राष्ट्रपतींचे अभिभाषणही होईल. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आपले प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकानं पराभव करत मुर्मू यांनी संपादन केला आहे. द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या राष्ट्रपती पदी विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर 25 जुलैला अनेक राष्ट्रपतींनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. अशा परिस्थितीत भारताच्या इतिहासात 25 जुलै ही तारीख राष्ट्रपतींच्या शपथविधीसाठीही ओळखली जाते.

गृहमंत्रालयाने आज काढलेल्या अधिसूचनेनुसार सोमवारी सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास संसदेच्या मध्यवर्ती कक्षामध्ये सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा नवनिर्वाचित राष्ट्रपतींना पदाची शपथ देतील. या सोहळ्यासाठी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंशसिंह, केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षांचे नेते, तिन्ही सेनादलांचे प्रमुख यांच्यासह दोन्ही सभागृहांमधील खासदार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व देशांच्या राजदूतांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

आतापर्यंत या राष्ट्रपतींनी घेतली 25 जुलै रोजी शपथ

नीलम संजीव रेड्डी (Neelam Sanjiva Reddy) (25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982)

ज्ञानी जैल सिंह (Giani Zail Singh) (25 जुलै 1982 ते 25 जुलै 1987)

रामास्वामी वेंकटरमन (Ramaswamy Venkataraman) (25 जुलै 1987 ते 25 जुलै 1992)

शंकरदयाल शर्मा (Shankar Dayal Sharma) (25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997)

केआर नारायनन (K. R. Narayanan) (25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002)

एपीजे अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam) (25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007)

प्रतिभा पाटिल (Pratibha Patil) (25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012)

प्रणब मुखर्जी (Pranab Mukherjee) (25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017)

रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) (25 जुलै 2017 ते 25 जुलै 2022)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Satara Rain Update : साताऱ्यात पूरस्थिती गंभीर! कृष्णा-कोयना नद्या ओसंडून वाहिल्या, 350 नागरिकांचे स्थलांतर

Video Viral : हिंदुस्तान जिंदाबाद... लंडनमध्ये मुस्लिम मुलींचं तिरंग्यासाठी भिडल्या; नेमकं प्रकरण काय?

AsiaCup 2025 : ...तरीही त्याला संघात संधी! कॅप्टन दादाकडून 'या' खेळाडूबद्दल महत्त्वाचं वक्तव्य; म्हणाला,

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द