ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस पकोडे तळून 'बेरोजगार दिन' म्हणून साजरा; अमरावतीत युवक काँग्रेसचे आंदोलन

Published by : Siddhi Naringrekar

सूरज दहाट, अमरावती

‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राजकारण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका सुरू झाली आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातेत गेल्याने महाराष्ट्रातील शिंदे सरकार तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांनी टीकासत्र सुरु केले आहे.अमरावती येथील पंचवटी चौकात युवक काँग्रेसचे वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करणार आहेत.

यावेळी हातगाडीवर युवक काँग्रेसचे वतीने जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या नेतृत्वाखाली पंकोडे तळून व विकून पंतप्रधान मोदी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्यात, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पामार्फत महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना रोजगार मिळणार होता. मात्र आता तरुणांचा रोजगार हिरावल्याची भावना राज्यातील जनतेत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला,पन्नास खोके एकदम ओके या ‘खोके सरकारच्या या कृतीचा निषेध’ अशा आशयाच्या बॅनरवर झळकले होते.

महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."