Admin
Admin
ताज्या बातम्या

IND vs AUS: आज इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची चौथी कसोटी; पंतप्रधान मोदी अन् ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची उपस्थिती

Published by : Siddhi Naringrekar

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहे. हा सामना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज स्टेडियममध्ये उपस्थित राहून पाहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 मार्च रोजी अहमदाबादला पोहोचले आहेत. पीएम मोदी गव्हर्नर हाऊसमध्ये रात्रीचा मुक्काम करणार आहेत. तर दोन्ही पंतप्रधान आज सकाळी साडेआठच्या सुमारास स्टेडियमवर पोहचणार असल्याची माहिती मिळत आहे.

या सामन्याची नाणेफेक सकाळी 9 वाजता होणार असून त्यानंतर सामना 9.30 वाजता सुरू होईल. पीएम मोदी आणि अँथनी अल्बानीज सकाळी 8.30 वाजता स्टेडियमवर पोहोचणार आहेत. स्टेडियममधून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान मोदी थेट राजभवनात जातील.

तसेच दोन्ही दिग्गज नेते टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना भेटणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान सामना पाहण्यासोबतच कॉमेंट्रीही करू शकतात. अशी माहिती मिळत आहे.

पुण्यातील रेसकोर्स मैदानात PM मोदींचं मोठं विधान, म्हणाले; "देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनमध्ये..."

शरद पवारांनी PM मोदींसह अमित शहांवर फुंकली 'तुतारी', म्हणाले; "जो महागाई वाढवतो, त्यांना..."

Harbour Railway: तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला