ताज्या बातम्या

IPL 2025 | PM Narendra Modi On Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या शतकी खेळीची पंतप्रधान मोदींकडून दखल, कौतुक करत म्हणाले...

बिहारमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स 2025 स्पर्धा होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बिहारमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स 2025 स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात संबोधित करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयपीएल 2025 स्पर्धेत चर्चेत असलेल्या 14 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत 14 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत झालेल्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 35 चेंडूत शतक पूर्ण केलं होते. यामुळे त्याचे अनेकांनी कौतुक केलं.

"मी तुम्हाला क्रिकेटमधील एक उदाहरण देतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, "आता मी आयपीएलमध्ये बिहारच्या सुपुत्र वैभव सूर्यवंशीचा शानदार खेळ पाहिला. इतक्या कमी वयात वैभवने जबरदस्त रेकॉर्ड बनवला. वैभवच्या या चांगल्या खेळामागे त्याची मेहनत तर आहेच पण वैभवने विविध स्तरांवर खेळून आपलं कौशल्य विकसित केलं. जो जितका खेळेल, तितकी कामगिरी आणखी चांगली होते."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा