PM Narendra Modi  
ताज्या बातम्या

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी (13 सप्टेंबर) मणिपूर दौर्‍यावर जाणार आहेत.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

पंतप्रधान मोदी आजपासून 5 राज्यांच्या दौऱ्यावर

आज मणिपूरला देणार भेट

2023च्या हिंसाचारानंतर मोदींचा पहिलाच मणिपूर दौरा

(PM Narendra Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी (13 सप्टेंबर) मणिपूर दौर्‍यावर जाणार आहेत. मे 2023 मध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये झालेल्या भीषण हिंसाचारानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. त्या काळातील जातीय संघर्षात तब्बल 260 लोकांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे 60,000 नागरिकांना विस्थापित व्हावे लागले होते. सध्या मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू असून, सुरक्षा यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलीस दलासह CRPF, BSF आणि आसाम रायफल्सचे दहा हजार जवान तैनात असतील.

या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी 7,300 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांना सुरुवात करणार आहेत. चुराचांदपूर येथे रस्ते व जलनिस्सारण सुधारणा, राष्ट्रीय महामार्गांचा विस्तार, माहिती-तंत्रज्ञान प्रकल्प आणि कामगार महिलांसाठी वसतिगृहे उभारणी अशा मोठ्या योजनांची पायाभरणी होईल. तसेच इंफाळमध्ये सचिवालय इमारत, नवीन पोलीस मुख्यालय आणि इतर महत्त्वाच्या सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

पंतप्रधानांचा हा दौरा केवळ मणिपूरपुरता मर्यादित नसून, ते आसाम आणि मिझोरममध्येही विकास प्रकल्पांना प्रारंभ करणार आहेत. या तीन राज्यांसाठी मिळून तब्बल 36,000 कोटींच्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Elphinstone Bridge : "मुंबईकरांनो, एल्फिन्स्टन पुलासंदर्भात महत्त्वाची माहिती; कोणते रस्ते सुरु कोणते बंद जाणून घ्या...

Uddhav Thackeray : “नीरज चोप्राला देशद्रोही म्हणणारे ...” – उद्धव ठाकरेंचा सवाल

Ghatkopar Accident : घाटकोपरमध्ये भरधाव मोटारगाडीचा अपघात; पदपथावर झोपलेले तिघे जखमी

Bhushan Gavai : सरन्यायाधीश भूषण गवईंचं फटाक्यांवरील देशव्यापी बंदीबाबत मत, म्हणाले....